ये बाबा..
ये बाबा..
ये बाबा..
ये बाबा,असा कसा रे तू
जराही दमत नाहीस
आणि दमलास तरी
कधी कळू देत नाहीस
जबाबदारी च ओझ
घेवून
कसा रे बाबा तू
हसत मिरवत फीरतोस
सगळ्यांची काळजी
घेणे
तूलाच कस रे जमत
मला जमेल का रे बाबा
असं,
हे च मी विचार करतो
आईच दुःख ती
अश्रू गाळून
व्यक्त करते
तूला तर बाबा
तोही अधीकार नाही
बापासाठी त्याच मुल
हे त्याच्या काळजाचा
तुकडा असत
फक्त एवढेच
कळायला
का, रे बाबा
एवढा उशीर लागतो
ये बाबा,
तू सोबत असलास
की कसलीच
भिती वाटत नाही
तू माझ्या जवळ
पोहोचेपर्यंत
जिवात जीव
माझा राहत नाही
तूझ्या चेहऱ्यावर
हास्य दिसलं
की
खूप बरं वाटतं
तुला जीवनात
खूप आनंद मिळो
हेच माझ
मन मागतं..
Happy father's day
