धरणी आई
धरणी आई
आईचे असतात रुप अनेक
उपकारांमुळे तिच्यापुढे कृतज्ञ
असतो तिचा लेक//१//
आईचेच एक स्वरूप
म्हणजे माझी धरणी आई
तिच्यामध्ये दिसतो प्रत्यक्षात
मला माझा परमेश्वर साई//२//
ज्याच्या डोक्यावर असेल
धरणी आईचा हात
तो करू शकतो
कुठल्याही समस्यांवर मात//३//
पदरात जेव्हा ती धान्य देते
त्यागाची तिची भावना
स्पष्ट दिसून येते//४//
ती फक्त देत असते
मोबदल्यात काही घेत नसते
म्हणूनच कदाचित
ती आई असते, ती आई असते//५//
