थोड तुझं थोडं माझं..
थोड तुझं थोडं माझं..
थोड तुझं थोडं माझं..
थोड तू रडावं
थोड मी रडावं
थोड तुझं थोडं माझ
करत करत
आयुष्य सरून जाव//१//
थोड तू हसावं
थोड मी हसावं
थोड तुझं थोडं माझ
करत करत
आयुष्य सरून जाव//२//
थोड तू चुका व
थोड मी चुका व
थोड तुझं थोडं माझ
करत करत
आयुष्य सरून जाव//३//
कधी तू माफ कराव
कधी मी माफ कराव
थोड तुझं थोड माझ
करत करत
आयुष्य सरून जाव//४//
कधी तू पुढाकार घ्यावा
कधी मी पुढाकार घ्यावा
थोडं तुझं थोडं माझं
करत करत आयुष्य सरुन जाव//५//
कधी तू माघार घ्यावी
कधी मी माघार घ्यावी
थोडं तुझं थोडं माझं
करत करत आयुष्य सरुन जाव//६//
