सुंदर माझी गौराई
सुंदर माझी गौराई
सुंदर माझी गौराई
आली माझ्या दारी
लेवून टिळा भारी
नेसून शालू भरजारी//१//
सुंदर माझी गौराई
आली माझ्या दारी
आशीर्वाद घेऊनही कल्याणकारी
तिला खुश ठेवणे
ही माझी जबाबदारी//२//
सुंदर माझी गौराई
आली माझ्या दारी
आनंद मावे ना उरी
काय, काय करू
तिच्या स्वागतासाठी तयारी//३//
सुंदर माझी गौराई
आली माझ्या दारी
रूपावर तिच्या दिसे हास्य भारी
नमन करती तिला सर्व नर नारी//४//
सुंदर माझी गौराई
आली माझ्या दारी
दुःख हरेल ती माझी सारी
प्रसन्नतेचा सुगंध दरवळतो
प्रत्येकांच्या घरोघरी//५//
