ये आई
ये आई
ये आई मला पाण्यात खेळू दे,
पाण्याचे थेंब थेंब पाहू दे.
लढविल मी थोडीशी शक्कल,
अन भिजविल अशी ही चप्पल
ये ग ताई येना ग आई,
पाणी खेळायची मलाच घाई.
उडीच मारून पाणी उडविल,
असा मी तुलाच भिजविल
दादाला बोलेल बाबांना सांगेन,
मीच पाण्याला उडवलं म्हणेन.
घरी गेल्यावर मिळू दे सजा,
पण तू येऊन बघ किती येते मजा,
बाबा चिडेल तुलाच मारेल,
आई माया माझीच करेल
ये आई मला पाण्यात खेळू दे,
पाण्यात मला प्रतिबिंब पाहू दे.