STORYMIRROR

Arun V Deshpande

Fantasy

2  

Arun V Deshpande

Fantasy

या पावसात

या पावसात

1 min
14.3K


कोंब प्रीतीचे मनात

फुलले या पावसात

आनंदाच्या झुल्यामध्ये

झुलावे मस्त पावसात


रिमझिम पावसाच्या

मोहक त्या आठवणी

पाहुनी पाऊसधारा

मनात त्या आठवणी


मनाचिया शिंपल्यात

आठवांचे जपू मोती

एका एका मोतियाने

माळा साऱ्या गुंफिती


भिजलो मनमुराद

अशा या पावसात

पुन्हा भिजूया असे

मस्त या पावसात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy