Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manjusha Galatage

Tragedy Children

4.2  

Manjusha Galatage

Tragedy Children

व्यथा बालमजूराची

व्यथा बालमजूराची

1 min
153


सांगू माझी व्यथा कुणाला,

 मुकलो आहे बालपणाला .

हवेच का हे जगण्यासाठी,

 मजुरीचे मज ओझे पाठी .


निघून चालले बालपण माझे ,

डोळ्यातील ते स्वप्नही ताजे .

शिक्षणाचा हक्क मलाही,

कधी न वाटे दफ्तर ओझे .


कोवळ्या खांदयांवर माझ्या ,

जबाबदारीचे जोखड आले .

अवेळी बालमन माझे ,

प्रौढाहूनही मोठे झाले .


चिमुकल्या हातांवर माझ्या ,

कष्टाची का रेघ असे ?

वही - पुस्तकाची आस मलाही ,

ज्ञानाची मज भूक असे.


निष्पाप बालमन माझं ,

रित न माहित दुनियेची .

फुलण्याआधी कळी जीवाची ,

फिरली चक्रे दैवाची .


निरागस नजरेत माझ्या,

जिज्ञासा ती शिकण्याची .

भिती मलाही जगण्यासाठी ,

अस्तित्त्वाला विकण्याची .


मजुरीचा हा भार न पेले ,

व्यर्थ झुंजणे शरीराचे .

आयुष्याच्या चटक्यांनी का

वाढवावे अंतर वयाचे ?


वीतभर पोटासाठी लागली ,

मोलमजुरी अन् घाम गाळणे .

शिकण्याच्या या वयात माझ्या,

खडतर वाटेवरूनी चालणे .


नकोच आता बंधन कुठले ,

नकोच कुठली लाचारी .

मिळोत आम्हां हक्क आमचे ,

याहून नसे काय दुनियेत भारी .


जगायचे मज आहे आता ,

स्वतंत्र अन् स्वाभिमानाने .

सहानुभूतीच्या शब्दांपेक्षा,

जगू द्या मला ताठ मानेने !!Rate this content
Log in