STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

1 min
179

धरित्रीच्या या मातीत

एकनिष्ट एकरूप

वटवृक्ष उभा ठाके

धरा सावित्रीचे रूप...

पसरली आसपास

मुळे धरेचा आधार

पाय रोऊनी हा घट्ट

देई फांदीस आकार ...

शाखा शाखा त्या वाढल्या

त्यांचा जाहला प्रसार

धरी साऊली जीवास

बसावया बांधू पार ...

क्षणभर विश्रांतीस

प्राणवायू मिळे खास

निसर्गाच्या सान्निध्यात

घ्यावा मोकळा तो श्वास ...

मानवास आले भान

जाणिवांना आली गती

सावित्रीने या जाणली

मनी वृक्षाची महती ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational