Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

वसुंधरेच्या वेदना

वसुंधरेच्या वेदना

1 min
386


वसुंधरेच्या वेदनांना कुठे तरी का अंत आहे

पुत्र तिचे म्हणवून घेती कुणास त्याची खंत आहे ।।धृ।।


वख्खर, नांगर घालून फोडतो पोट काळ्या आईचे

ओरबडतो शालू हिरवा स्वरूप कुरूप वनराईचे

विसरतो धरणी माता हीच खरा भगवंत आहे ।।१।। 


रोज पदप्रहार झेलते कधी तिची तक्रार नाही

कष्ट केलेल्यास देते फळ ठेवत उधार नाही

परी मानवा विचार करण्या थोडी कुठे उसंत आहे ।।२।।


तऱ्हेतऱ्हेच्या वनौषधी ती मनुजासाठी निर्मितसे

मानवाला पुष्ट कराया रानमेवा ती देत असे

दुःखितांच्या जीवनात ती फुलविते वसंत आहे ।।३।।


वृक्ष, वेली, फुला फळांनी अजून पुत्रा सुख देते

गंध मातीचा प्राप्त होता मनास प्रसन्नता येते

मनुजावर उपकार धरेचे अनादी अनंत आहे ।।४।।


नष्ट करतो झाडे, वेली माणूस हा स्वार्थापोटी

झाडे लावून कधी ना वाटे तिची भरावी का ओटी

ज्यास उमजली कृतज्ञता ही तोच भाग्यवंत आहे ।।५।।


Rate this content
Log in