वसंत फुलला
वसंत फुलला
शेलओळ –वसंत बहरला
ग्रीष्म उन्हाच्या त्या झळा
झळा आता सोसवेना
कधी येईल वसंत
वसंत देई चेतना
प्रेम वसंत फुलला
फुलला तो पानोपानी
प्रेमरंगी बहरला
बहरला तो जीवनी
झाडे वेली बहरली
बहरली अंगोपांगी
प्रेमरंगात रंगली
रंगली ती सप्तरंगी
सप्तरंगी इंद्रधनू
इंद्रधनू अवतरे
नवतेजात नाहले
नाहले ते जग सारे
अमृतरु बहरला
बहरला रानीवनी
गाते कोकिळा मधुर
मधुर ती प्रेमगाणी
रक्तवर्णी तो पळस
पळस तो बहरला
केशरी त्या रंगांनी
रंगांनी तो मोहरला
नेत्र सुखावले माझे
माझे मन बहरले
येता वसंत जीवनी
जीवन ही शहारले
नवतेजाची ती गुढी
गुढी आज उभाऊया
नवचैतन्य लेवून
लेऊन नटली काया
दारी रांगोळी शोभते
शोभते ती अंगणात
चैतन्याची ती गुढी
गुढी उभी आनंदात