वर्तुळ
वर्तुळ
प्रयत्नांचे बाण भात्यातून मी काढत रहाते
आव्हानांच्या धनुष्याला कायम ताण देत रहाते...
प्रयत्नांना बळ कधी लाभतच नाही
सफलतेपर्यंत मी कधी पोहचतच नाही
प्रयत्न करणं मी सोडत नाही ....
जीथे बाण पडतात तिथेच वर्तुळ आखत जाते
त्यालाच लक्ष्य मानत जाते...
मग मी केंद्रपासूनचे अंतर कमीच ठेवते
आपोआपच लक्ष्मणरेषा तयार होते ...
वर्तुळापासुन अंतर लक्षात न घेताच तीर सुटत जातात...
आणि प्रयत्नांचा फोलपणा दाखवत रहातात ...
मी न थकता तीर चालवत रहाते
माझं नेमकं वर्तुळ शोधत रहाते...
माझं नेमकं वर्तुळ शोधत रहाते...
