वर्तमान पुढती
वर्तमान पुढती


काव्यप्रकार अष्टाक्षरी
वर्तमान सदा जाण
नको बघणेच मागे
भूतकाळ सरलेला
पुढे पुढेच चालावे (1)
अगणित चुका होती
बालपणी न मोजावे
नको उजळणी मागे
पुढे पुढेच चालावे (2)
शब्द ओठांवरी येती
निसटती वायुवेगे
पुन्हा नच मागे येती
पुढे पुढेच चालावे (3)
चुके मार्ग जीवनात
दिशा वेगळीच मिळे
नवा मार्ग सापडता
पुढे पुढेच चालावे (4)
जवळची प्रिय व्यक्ती
कधी चुकून दुखवे
क्षमा तत्काळ करुनी
पुढे पुढेच चालावे (5)
जीवनाचे सूत्र सांगे
नच माघारी यायचे
मार्ग खुला पुढलाचि
पुढे पुढेच चालावे (6)