STORYMIRROR

Ganesh Gajanan Kene

Inspirational

3  

Ganesh Gajanan Kene

Inspirational

वर्षाऋतू

वर्षाऋतू

1 min
267

आगमन होताच वर्षाऋतूचे

समाधान मनास वाटे....

करुनी मशागत शेतीची

वाट पाही शेतकरी

पडताच सरी पावसाच्या

पेरणीस सुरुवात करी....

होताच शिडकावा पावसाचा

दाहकलेली धरतीही

शितल होऊन आनंदते...

उपजोनी गवत, वेली

हिरवळ झाडी शोभते...

बरसूनी जलधारा पावसाच्या

तुडुंब भरती नदीनाले...

हिरवळ पांघरूणी

नटले शिखर, डोंगर

डोईवरुन झरे कोसळूनी

खळखळणारे धबधबे वाहती....

होऊनी तृप्त सारी अवनी

जीवजंतू अन् पशूपक्षी

आनंदाने सारे नांदती...

हाच आनंद चिरकाळ टिकण्यासाठी

म्हणूनी मानवा घे शपथ

पर्यावरण रक्षणाची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational