Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ganesh Gajanan Kene

Inspirational

3  

Ganesh Gajanan Kene

Inspirational

मृद्गंध पावसाचा

मृद्गंध पावसाचा

1 min
221


उगवताचं जून महिना

ओढ लागते पावसाची

अंबरातील मेघ ही

संकेत देतात पावसाची.//१//


उकाड्याने हैराण होऊनी

सर्वच पावसाची वाट पाहती

पडताच पावसाच्या सरी

सारे प्राणी, पशूपक्षी आनंदती.//२//


तप्त झालेली मृदा ही

आतुरलेली शितल होण्यासाठी

पडताच पावसाच्या सरी

भेगाळलेल्या शेतांनीही मारली मगरमिठी.//३//


पडताच पावसाच्या सरी धरेवरी

मृदगंध पावसाचा दरवळे वातावरणी

शिरताचं मृदगंध नाकामधी

मन ही होते समाधानी.//४//

 

पावसात तृप्त होऊनी धरणी

उदरी बहु बिजांकूर उपजती

अंगावरी हिरवे वस्त्र लेऊनी

रंगीबेरंगी पानाफुलांनी शृंगार करती.//५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational