STORYMIRROR

Ganesh Gajanan Kene

Romance

3  

Ganesh Gajanan Kene

Romance

ओढ तुझी

ओढ तुझी

1 min
373

का गं अशी छळतेस तू मला

माझा जीव बघ कसा

तुज पाहण्यासाठी कासावीस झाला..ll


माझे मन अंतरीतून सतत तुला

आवाज देत आहे गं

हे कसं सांगू मी तुला..ll


तुज पाहण्यासाठी नयन माझे

तुझ्या वाटेवर किती टक लावून थबकलेत

ते कसं सांगू मी तुला..ll


तुझ्या कंठातील मधूर ध्वनी ऐकण्यासाठी

माझे कर्ण किती अधीर झालेत

ते कसं सांगू मी तूला..ll


म्हणूनी हृदयातुनी सांगतो मी तुला

का गं अशी छळतेस तू मला

माझा जीव बघ कसा

तुज पाहण्यासाठी कासावीस झाला..ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance