तुझा विरह
तुझा विरह


का कोणास ठाऊक
हृदयाचा प्रत्येक ठोका पडताना
फक्त तुझीच आठवण येतेl
मी काढलेल्या आठवणीची भले
लागत नसेल तुला उचकीl
पण! तुझ्या आठवणी शिवाय
माझा श्वासोंच्छवासचं चालत नाहीl
तू असशील गं तिकडे मजेत
मात्र मी जगतोय इकडे
तुझ्या आठवणींच्या सजेतl
मला माहित नाही गं
तुझं नी माझं काय आहे नातं
पण, माझ्या ओठांवर
फक्त तुझचं नांव आहेl
अशा कित्येकींनी प्रयत्न केला
माझा लक्ष त्यांच्याकडे वेधण्याचा
पण, मी कधी तुझ्याशिवाय
इतरांचा विचारचं केला नाहीl
मी कधीच भूललो नाही
इतरांच्या रंगाला नी रूपाला
मी भुललोय फक्त तुझ्या
अंतरीच्या हृदयाला नी स्वभावालाl
मला माहित आहे गं
तू मला इग्नोर करते आहेस
पण, असे असले तरी मात्र
मी तुला विसरु शकत नाहीl
कारण, तुला विसरायचे असेल तर
मला माझे हृदय आणि डोळे
कायमचेच बंद करावे लागतील II