कधी रे येईल जीवनसागराला भरती
कधी रे येईल जीवनसागराला भरती
1 min
226
कधी रे येईल जीवनसागराला भरती
वाट पाहतो चातकासारखी
करुनी खूप प्रयत्न
जगतो उद्याच्या आशेवरती
असे वाटते आज नाही तरी
उद्या येईल जीवनसागराला भरती
दूरवर दिसते आहे, येत आहे
आपल्याचकडे लाटांची भरती
पण काय करणार?
जीवनसागराच्या किनाऱ्याचा आणि
लाटांचा एवढा अंतर आहे की,
त्या वाटायचं किनाऱ्यापर्यंत पोहचतच नाहीत
असे वाटते या जीवनसागरात लाटांऐवजी
सगळीकडे कोरडे वाळवंटच आहे
म्हणूनी शंका येते मनी
येईल की नाही या जीवनसागराला भरती...
