STORYMIRROR

Ganesh Gajanan Kene

Others

3  

Ganesh Gajanan Kene

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
133

मला लागली आहे रे ओढ पावसाची

जास्त होतो उकाडा तेव्हा लागते

ओढ पावसाची...


टिपळूनीचं पाणी भरून जेव्हा

थकतात माझ्या आया बहिणी तेव्हा

त्यांनासुद्धा लागते ओढ पावसाची...


लगबगीने करून घेतो शेतकरी मशागत शेतीची

निश्चिंत होऊनी तयार असतो शेतीच्या कामासाठी

कारण, त्यालाही लागलेली असते

ओढ पावसाची...


शेतातील मातीही मोठ्या भेगांच्या रुपात

'आ' वासून असते आपली तहान भागवण्यासाठी

कारण, तिलाही लागलेली असते

ओढ पावसाची...


जमिनीवर पडलेली नानाविध बीजेसुद्धा

उन्हात तापून तयार असतात अंकुरण्यासाठी

कारण, त्यांनासुद्धा लागलेली असते

ओढ पावसाची...


लहान-मोठे पक्षीही गवत काड्या गोळा करूनी

आपले घरटे बांधुनी घेती झाडांवरी

कारण, त्यांनासुद्धा लागलेली असते

ओढ पावसाची...


ओसाड माळरानही उत्सुक आहे

आपल्या अंगावर हिरवळ पांघरण्यासाठी

कारण, त्यालाही लागलेली असते

ओढ पावसाची...


गायी, गुरे, वासरे आणिक इतरही पशुंना

उत्सुकता असते हिरवे कुरण खाण्याची

म्हणून त्यांनाही लागलेली असते

ओढ पावसाची...


कोरडे ओढे, कोरड्या नद्या आतुरलेल्या आहेत

खळखळत वाहत जाऊन सागराला भेटण्यासाठी

कारण, त्यांनाही लागलेली असते

ओढ पावसाची...


सांगायचे तात्पर्य काय तर

सकलजनांनाच लागलेली असते

ओढ पावसाची...


Rate this content
Log in