रानवेल
रानवेल
1 min
353
वनराईतील वेली सारखे
जीवन तुझे फुलले गंl
निसर्गातील झाडाझुडुपांमध्ये
मिसळून कशी गेलीस गंl
तांबड्या-काळ्या मातीमध्ये
भक्कम पाय रोवलेस गंl
जांभळ्या, निळ्या, लाल, पिवळ्या
फुलांसवे रमतेस गंl
धटिंगपणाने उन, वारा, पाऊस
आनंदाने झेलतेस गंl
वनदेवतेच्या सानिध्यात
नित्य रमून जातेस गंll