वृृक्षसखा
वृृक्षसखा


*वृक्ष आमुचा सखा*
*तयांना तोडू नका*
*पर्यावरणासी होईल*
*हानी आणि धोका॥१॥*
*धरुनी प्रेमळ छाया*
*करुनी आईसारखी माया*
*पान,फुल,फळे देती*
*पसरुन आपुली काया॥२॥*
*वृक्ष लावुनी*
*वाचवु निसर्गाला*
*बंध जिव्हाळ्याचे*
*लावुयात वृक्षाला॥३॥*
*प्राणवायु देऊनी*
*वाचवी मानवाला*
*सृष्टीचे संतुलन राखुनी*
*आनंदी ठेवतो निसर्गमातेला॥४॥*
*वसा वृक्षांचा देत राहणे*
*जपुयात आपण मनात*
*निरपेक्ष,निस्वार्थी भाव*
*रुजवुया जनाजनात॥५॥*
*झाडेच झाडे लावुया*
*झाडेच झाडे जगवुया*
*पुढील पिढीला देऊया वारसा*
*वृक्षसखा दाखविल आरसा॥६॥*