निरोप आता बाप्पाला
निरोप आता बाप्पाला

1 min

408
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला
येतो लाडका बाप्पा घरा
लहान थोर मंडळींच्या
आनंदा उधाण येतो खरा॥१॥
विघ्नहर्ता तू , सुखकर्ता तू
तुझेच नाव लंबोदर
बुध्दीची देवता तू
नेसतो केशरी पितांबर॥२॥
दहा दिवस घरात विराजमान तू
नेवैद्या मोदक लाडू
तुझ्याचपुढे ठेविते सोनियाचा गडू॥३॥
तू येता आकाश
काळ्या ढगांनी भरलेले
अनंत चतुर्दशीला तू जाताना
डोळे आसवांनी माझे भरलेले॥४॥
शेवटी एकच मागणे बाप्पा
तुझा निरोप घेताना
महामारीलाही घेऊन जा जाताना ॥५॥