STORYMIRROR

Dipali Lokhande

Tragedy

3  

Dipali Lokhande

Tragedy

संकट कोरोनाचे!

संकट कोरोनाचे!

1 min
349

जगात पसरली भयानक

कोरोना महामारीची साथ

एकजुटीने आपण सर्व

करूयात त्यावर मात॥१॥


गरीबांचा उचलला कोरोनाने

तोंडातील घास

सांग ना देवा! गरीब

घेतील का मोकळा श्वास॥२॥


परप्रांतीय मजूरांनी

धरली गावाकडची पायवाट

कधी उजडेल देव जाणे

त्यांच्या नशीबी चैतन्याची पहाट॥३॥


कोरोनाने ढासळली

देशाची आर्थिक स्थिती

सामान्य जनतेच्या मनी

बसली कायमची भीती॥४॥


कोरोनाच्या संकटाने आता

पाखरांविना पोरकी झाली शाळा

ऑनलाईन शिक्षणात तर मजाच येईना

शेवटी एकच मागणे आता लवकर ये शाळेत बाळा॥५


पोलिस, डाॅक्टर, शिक्षक, नर्स

रात्रंदिवस लढतंय आपल्या जीवासाठी

सलाम त्या कोरोना योद्ध्यांना

कष्ट घेता जनतेसाठी॥६॥


सुरक्षिततेसाठी घरातच बसू

सॅनिटायझर, साबणाचा वापर करु

कर्फ्यूचे, लाॅकडाऊन नियम पाळूनी

कोरोनाला देशातून हद्दपार करु॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy