झाले आकाश ठेंगणे
झाले आकाश ठेंगणे
1 min
261
झाले आकाश ठेंगणे
आनंद मजला झाला
सोनपरी जन्मली आज
लक्ष्मी आली माझ्या घराला॥१॥
झाले आकाश ठेंगणे
आनंद मजला झाला
तिचे गालात हसणे
रिझविते माझ्या मनाला॥२॥
झाले आकाश ठेंगणे
आनंद मजला झाला
तिच्या दुडूदुडू चालण्यानं
शोभा आली घराला॥३॥
झाले आकाश ठेंगणे
आनंद मजला झाला
तिचे लाड पुरविण्या
कष्ट करावे लागे मजला॥
