STORYMIRROR

Dipali Lokhande

Inspirational

3  

Dipali Lokhande

Inspirational

स्त्रीशिक्षण

स्त्रीशिक्षण

1 min
119

लाविला ज्ञानाचा दिवा

सावित्री माऊलीने

लेकीने घेतली भरारी

तिच्याच साथीने॥१॥


स्त्री शिक्षणासाठी घेतले सावित्रीमायने कष्ट

शेणगोळ्याचा मारा झेलला

लेकींवर तुझाच आहे वरदहस्त॥२॥


परंपरांची ओझी झुगारुन

हातात पाटीपेन्सिल घेतली

उंबरठ्याबाहेर पाऊल टाकूनी

लेकींच्या पायातील बेडी सोडविली॥३॥


स्रीयांच्या शिक्षणासाठी

संकटांना झुंज दिलीस

लेकींना आधार देऊन

महात्म्यांची पत्नी झालीस॥४॥


लेकींना शिक्षणाची कवाडे खुली करुनी

गगनी भरारी घेण्याचे बळ देऊनी

एक नवं क्षितिज उभं केलं॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational