STORYMIRROR

Dipali Lokhande

Others

3  

Dipali Lokhande

Others

माझा शेतकरी राया

माझा शेतकरी राया

1 min
36


रातंदिस राबतो शेतात

माझा शेतकरी राया

तवा पिकाला येतो बहर

झिजवून त्याची काया॥१॥


कोरडे नक्षत्र जाता

अश्रू येती नयनाला

शेतकरी माझा राया

तोंड देतो संकटाला॥२॥


काळ्या आईची सेवा

करतो माझा शेतकरी राया

निस्वार्थ धरणीवर माया

कष्ट त्याचे नाही जात वाया॥३॥


Rate this content
Log in