चाफा
चाफा
1 min
303
सोनचाफा फुलला
माझ्या परसदारी
परिमळ दरवळला
माझ्या अंगण दारी ॥१॥
अनेक नावे
या सुमनाला
पांढरा, तांबडा
चाफा डवरला ॥२॥
चाफा वाहुनी
कुलदेवतेला
सुगंधीत करते
देवघराला ॥३॥
सोनचाफ्याची कळी
जणु रुप गोजिरे
पाहताच कळीला
मन मोहरले॥४॥
