माय भीमा
माय भीमा

1 min

262
तुझ्याच तीरावर सुंदर
वसले माझे गाव
तुझ्याच कुशीत जन्मले माय
भीमा ऐसे नाव॥१॥
उगम झाला तुझा
भीमाशंकर डोंगरात
वाहत वाहत आलीस
माझ्या सुंदर गावात॥२॥
जीवनदायिनी आहेस
माझ्या बळीराजासाठी
नित्य तुजला पुजिते
सार्यांच्या सुखासाठी॥३॥
पशु—पाखरे येती
तुझ्याकडेच मायेने
निर्मल जल प्राशुनी
तृप्त होती मने॥४॥
पुढील प्रवास तुझा
सुरु पंढरपूर वाटेने
चंद्राकार वाहत जाऊनी
धारण करते नाव चंद्रभागा॥५