क्षण एक आनंदाचा
क्षण एक आनंदाचा

1 min

374
क्षण एक आनंदाचा
गगनी माझ्या मावेना
कन्यारत्न आले घरा
पुजिले लक्ष्मीच्या पावलांना॥१॥
क्षण एक आनंदाचा
पाऊस पडला धरणीवर
बळीराजा सुखावला
आबादानी झाली शेतावर॥२॥
क्षण एक आनंदाचा
घालविला मैत्रिणी संग
स्वच्छंदीपणे हिंडलो
एक अविस्मरणीय प्रसंग॥३॥
क्षण एक आनंदाचा
मुलांमध्ये रमतानाचा
त्यांच्यासारखे लहान होऊन
बोबडगीते गातानाचा॥४॥