वर्दी
वर्दी




पोलिसाचा पोशाख
म्हणजे वस्त्र काटेरी
जनता आणि प्रशासन
यांची जबाबदारी दुहेरी
वर्दीच्या जीवावर
रुबाबही करता येतो
वर्दीमुळे गुंडा-पुंडांना
धाकही दाखवता येतो
वर्दीमुळे स्वतःचा स्वार्थदेखील साधता येतो
खलनिग्रहणाय सद् रक्षणाय
असादेखील वर्दीचा महिमा असतो
वर्दीचा आब
सांभाळता सांभाळता
निसरडी वाट जपून
चालावी लागते
एखादा डाग पडला तरी
आयुष्याची पुण्याई
पणाला लागते