वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
थकले होते ते आता
हवी होती विश्रांती
आयुष्यभर श्रम केले
आज हवी होती शांती!
कंबर ही पाठीतून
झुकलं होत आता
धाप ही लागत होती
चालता चालता!
चष्म्याचा नंबर तर
कधीच सरून गेला
कारण आता
मोतीबिंदू वर आला!
थरथरत्या हातांनी आता
पेलवतं नव्हते काही
जिची साथ हवी होती
ती ही सोडून गेली दिशा दाही!
तोंडातला घास आता
गिळता गिळवत नव्हता
कारण दंतोबांनीही काढता
पाय घेतला होता!
त्राण साऱ्या शरीरातील
संपतं चाललं होत
आता नीट उभ राहण्याचहीं
बळ राहील नव्हत!
म्हणून हवी होती विश्रांती
शेवटल्या त्या क्षणी
तुझ्याच प्रेमाची आस
उरली होती मनी!
पण तू तर तुझ्या पंखानि
कधीच आकाश गाठलंस
बाबाच अंगण तु
कधीच ठेंगण केलंस!
केले आयुष्यभर ज्यांनी
तुझ्यासाठी श्रम
शेवटल्या त्यांच्या क्षणी
दाविलास त्यांना तू वृद्धाश्रम..!
