STORYMIRROR

Smita Doshi

Inspirational

4  

Smita Doshi

Inspirational

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
608

पूर्वी समाजात रूढ होते चार आश्रम

पण आता ते आश्रम निभवताना वाटतात श्रम

आज थोरांचे करताना येतो नाकी दम

मग सेवेच्या प ळवाटीसाठी निघाले वृद्धाश्रम।


गृहस्थाश्रम चालवताना आता पेलेना खर्च

आज चैनीचं आयुष्य जगण्याचा आलाय टर्न

चैन करताना वाटतो आनंद येते मजा

नंतर घरखर्च भागवताना होती सजा


नको वर्चस्व,नको ती पिरपिर

तू,मी आणि मुलांची असू दे किरकिर

हौसेसाठी मोठा फ्लॅट,मिरवायला गाडी

चैनीच्या वस्तूंची झाली दाटीवाटी


कामाचा आळस,त्यात हॉटेलची चटक

मोठ्यांमुळे होते मग सारखीच चकमक

मग केली कर्तव्यामध्ये सहज काटछाट

मनापासून पहिला मान थोरांचा त्यात


दिवसेंदिवस वाढत आहेत आज वृद्धाश्रम

का ठेवता नव्या पिढीपुढे नसते आदर्श

उद्या येणार आहे आपलाही टर्न

मग म्हणू नका कृतघ्न कोण?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational