वनवास
वनवास
पुन्हा सूडाने बुद्धी पेटली, नवीन नाही शोधण्या.
दर्जा राखून प्रवास मांडा, अजूनही काही मागण्या.
चांगलं वाईट सारंच घडतंय, ऊत आलाय बातम्यांना.
रिकाम टेकडी निसर्ग पोसती, ओझ झाल नाक्यांना.
बेरोजगारी त्यात महागाई, शिक्षण फक्त कागदावर.
लाखो पेरले शिक्षणासाठी, दमडीच्या त्या पगारावर.
स्वप्न मोठी स्वप्नच राहिली, समज घातली मनाला.
जबाबदारी खांद्या आली, तसा लागलो कामाला.
घुसमट होते मोकळ्या हवेत, सतत अपमान वाट्याला.
गर्दीत आता शांत वाटते, दोष देतो बोचनाऱ्या काट्याला.
मार्ग आहे कठीण, खडतर आहे आयुष्याच्या प्रवास.
दुसरं तिसरं काही नाही, जगणं म्हणजे एक प्रकारचा वनवास.
