वंदन
वंदन
वंदन पहिले भारत मातेला
जिच्या पोटी जन्म घेतला ,
वंदन दुसरे राष्ट्रध्वजाला
फडफडणाऱ्या तिरंग्याला ,
वंदन तिसरे त्यां हुतात्म्यांना
दिले स्वातंत्र्य मिळवून त्याना
चौथे वंदन त्या वीरांना
सीमेवरच्या जवानांना ,
वंदन पाचवे सांगा कुणाला
जगत्पोसिँदा बळीराजाला ,
करितो वंदन गुरुजनांना
राष्ट्राच्या त्या शिल्पकारांला ...! !
Ravindra Gaikwad दापकेकर
