वळणावरती दोघे आपण
वळणावरती दोघे आपण
सहा ऋतूंचे , सहा सोहळे
स्वच्छंदपणे , उपभोगले
चंद्र चांदण्या , अनगिनत
तरीही मोजले , खुळेपणाने
वर्ष महिने , दिन सरती
मध्यमावरी , गाडी स्थिरावे
प्रपंचातले , गोड बंधन
गुंफण , रेशीमरज्जूमधे
निवृत्तीचे , लागता वळण
वळणावरती , दोघे आपण
आता हात , हाती घेऊन
उतरुया , रम्य उतरण
रसभरल्या , गप्पांची मैफिल
निसर्गरंगी , रंगू आपण
कांचनसंध्येचे , सुस्वागत
प्रेमभरे , करु या आपण
