STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

विठ्ठला

विठ्ठला

1 min
230

आक्रंदते मन माझे

कसे शांतवावे त्याला

माझ्या जिवाच्या वेदना

आज सांगू मी कुणाला ।।१।।


वाचा गेली मुका झालो

काही सांगता येईना

भोग भोगू तरी किती

दुःख संपून जाईना ।।२।।


काही दिसता दिसेना

दृष्टीवाचून आंधळा

तुझ्याकडे येत नाही

पाय असून पांगळा ।।३।।


गोड किती रूप तुझे

नाही कधी गूण गात 

नाम कानी येत नाही

प्रपंचाच्या गोंगाटात ।।४।।


सुखे होतो तुझ्या हाती

हात हातून सुटला

दूर गेलो दुःखी झालो

मनी विरह दाटला ।।५।।


तुझ्या भेटीसाठी आता

जीव माझा व्याकुळला

वात्सल्याने मांडीवर

उचलून घे विठ्ठला ।।६।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational