STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

4  

Bharati Sawant

Inspirational

विषय- वसंत फुलला

विषय- वसंत फुलला

1 min
932


सडा प्राजक्ताचा अंगणी पडला

मनोमनी असा वसंत फुलला

जाईजुई चंपा चमेली गंधाळल्या

पळसाचा लाल बहर दारी खुलला


वसंतात पानगळ दिसे रानीवनी

धुंद करी मोहर आम्रवृक्षाचा

फांद्याफांद्यांवर कोवळी पालवी

रव ऐकता कोकिळेच्या कुजनाचा


टांगला झोका वडाच्या फांदी

हिंदोळता सयींसंगे पहा अंगणी

माहेराच्या वाटेवरी झाल्या गोळा

दिन बालपणीचे काढती आठवणी


चैत्र सोहळा गुढीपाडव्याचा

बंधुराजा न्याया येतो सासरी

भेटता मायबापा भाऊ वहिनी

सुख सांडते सखीचं जाताना माहेरी


लेकीबाळा सुनामुली आल्या माहेरी

साऱ्या भेटती प्रेमाने सणावाराला

झिम्मा खेळती दारी अंगणात

तव वसंत मनोमनी गं फुलला


उन्हाळ्याचे दिस आलें करें

लोणची सांडगे पापड शेवया

दारी घातलेले वाळवण सारें

कोठारांत भरुया धान्य कुरडया


आला वसंतऋतू वाजतगाजत

भेगाळली भूई सारें शेतरान

तहानेले पशुपक्षी मुके जीव

कशी भागवावी त्यांची तहान



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational