विषय - दूरदृष्टी राजा
विषय - दूरदृष्टी राजा
सोळाव्या शतकांत शिवनेरीवर
वैशाख शुद्ध द्वितियेच्या तिथीला
शिवाई देवीने शुभ कौल दिला
जिजाऊने गोंडस पुत्र प्रसविला
बालपणीच शिकले सारे युद्धप्रकार
माँसाहेबांच्या कडक शिस्तीखाली
दांडपट्टा भाला नि तलवारफेक
दादोजी कोंडदेव गुरुच्या शिकवणीखाली
स्वराजाच घेतली रायरेश्वरापुढे आण
तलवारीने अंगठा कापून गाळले रुधिर
चौदाव्या वर्षी मुठभर मावळ्यांच्या
साथीने तोरणा किल्ला केला सर
हेरले गडदुर्गांचे सूक्ष्म महत्व
गनिमांच्या निगराणीवर लक्ष
बांधून किल्लेगड ठायी ठायी
खोदले आड जिथे पाण्याचे दुर्भिक्ष
बांधुनि धान्यकोठारे गडांवर
ठेविले पगारी गडकिल्लेदार
पुरविली रसद सैनिकांना
तोषविले शूरवीर सरदार
जिंकिले मुरुंबदेव कोंडाणा राजगड
लढूनि तलवारीच्या पात्यावर
गनिमांचा केला पुरता संहार
प्रोत्साहिले सैन्या देऊनि जागीर
पोर्तुगीज डच सिद्धी हबशी
करिती समुद्रमार्गे शस्त्रवार
जमविला राजांनी शस्त्रास्त्र साठा
सागरात उभारिले प्रचंड आरमार
टाकूनि शिसें सागरात खंडीभर
बांधिले समुद्रांत जल दुर्ग
पोर्तुगीजांना बसवली खीळ
जंजिरा विजय नि सिंधुदुर्ग
आता या गड किल्ल्यांची
झालीय पडझड पडले खिंडार
वस्ती बनवलीय चोरांचिलटांनी
लपवलेय चोरीचे लूटभांडार
