विषय - औक्षवंत हो..
विषय - औक्षवंत हो..
औक्षवंत गुणवंत,
किर्तिमान व्यक्तिमत्त्व,
सगळ्यांना हो दिसत,
पण असत एक तत्त्व...२
आयुष्य हे जगताना,
वय वाढत असत,
सुखाचे आणि कौतुकाचे,
दिवस आठवत असत... 3
दुःखाची पण वाट कापलेली असते,
कष्टाच्या पण ठोकर खाल्लेल्या असतात,
मिळालेल्या कीर्तीवर सगळ्यांच्या नजरा असतात,
आयुष्य जगल खूप कष्टाने असत.. ४
प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर,
सगळे काही आपल होत,
मन मात्र आईच्या शतायुषी हो,
औक्षवंत हो आशिर्वादासाठी आतुर होत.. ४
