Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sandhya Bhandwalkar

Inspirational

3  

Sandhya Bhandwalkar

Inspirational

शंभूराजे कैवारी

शंभूराजे कैवारी

1 min
227


सह्याद्रीचा वाघ होता जिजाऊंचा शिवा, 

रायगडावर बाळाची किलकारी घुमली , 

सईबाई पोटी जन्मला शिवबांचा छावा, 

१४ मे १६५७ ला शंभू जन्माची नौबत झडली... १


शंभूबाळ नाव दिले प्रेमाने, 

शुरवीर व्हावे काकांसम संभाजी ठेविले बारशाला,

तेजस्वी मुख आणि पिळदार देहयष्टी,

 ज्ञानाची सरस्वती जशी भरती सागराला... २


पराक्रमी असा शूरवीर जाहला,

बालपणी भिडला औरंगजेबाला,

शत्रूचा बिमोड केला,

 महाराणी येसुबाई अर्धांगिनी साथीला... ३


झुंजार तो लढला सागरी किनार्‍याला,

ना कधी पराभूत झाला,

फितुरीने घात हा केला,

शंभू राजे सापडले यवनाला... ४


मराठ्यांचा कोहिनूर गेला,

सूर्य अस्तास गेला,

पण जगाला त्यागाची शिकवला,

तीळातीळाने तुटून गेला.. ५


Rate this content
Log in