ऋणानुबंध
ऋणानुबंध
गंध प्रीतीचे मैत्रीचे,
ऋणानुबंध हे अंतरीचे,
एक नाते रक्ताचे,
एक नाते ऋणानुबंधाचे... १
प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा,
हा आहे नात्यांचा पाया,
मैत्री आहे निखळ,
ज्यात आहे माया... २
भेट काही क्षणाची,
आठवण राहते मनी,
नाती ही अशीच गोड गुलाबी,
पाठीशी खंबीर ऊभी... ३
ऋणानुबंध जपावे,
आयुष्य सुंदर करावे,
आयुष्याचा नाही भरोसा,
या जन्मावर शतदा प्रेम करावे... ४