Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Bhandwalkar

Abstract

3  

Sandhya Bhandwalkar

Abstract

आईच्या आठवणीत .....

आईच्या आठवणीत .....

1 min
227

उगवला सूर्यनारायण 

दारी किरणांचा सडा,

नभी दाटली रांगोळी ,

मन घालिते वेढा... १

चुलीतील तो धूर 

ओढ त्याला गगनाची,

माय रांधते भाकरी, 

 चिमण्या लेकरासाठी.. २

लगबग तिची जाया बांधावरती

राबतो तिचा धनी शेतावरती,

मायेची सावली तिची घरादारावरती,

उगवला अंकुर धन्य झाली धरती.. ३

प्रत्येक पानात तीच मन जात,

जाई जुई होऊन रानात फिरून येत,

कष्टाची भाकरी गोड झालं तोंड ,

धनी बसला देऊन समाधानी ढेकर..४

दिस मावळतीला आला,

अंग गेलंय शिणून ,

चिमण पाखरे येतील घरा,

पायात आलं लगेच अवसान..५

सांजवेळ झाली दिवाबत्ती केली , 

तृप्तीचा ढेकर देऊन गेली,

लेकराला घेऊन ती माऊली ,

निद्रेच्या अधीन झाली...६

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract