प्रेम
प्रेम
प्रेमा तुझा रंग कसा सांग ना?
आठवणीत हळूवार असा ठेवा,
पहिली भेट तुझी न माझी,
जसा आंबट गोड रानमेवा... १
प्रितीच्या या झुल्यावर जीव माझा झुरला
गुलाबी पानाचा होई उलगडा
मनामनांत आठवणीचा कोपरा हा सजला
जीव माझा होई आठवणीत वेडा.... 2
झुरून झुरून गेलो जिरुन,
जीव माझा काही कुठे लागेना,
मनाचा गोंधळ थांबेना,
प्रितीचा ताप काही निवेना.. 3
अशा या स्थितीत ती आली,
तोंडावर पाणी मारून गेली ,
ऊठ आता कामाला लाग,
असं म्हणून आईने जाण करून दिली.. 4

