वार्धक्य
वार्धक्य
हातावरच्या सुरकुत्या,
खूप काही सांगून गेल्या,
आयुष्यभर केलेल्या कष्टांच्या,
सर्व आठवणी जाग्या झाल्या... १
म्हातारपण आले आहे,
आधार आहे मुलांचा,
फरक दाखवतोय काळ,
दोन वेगवेगळ्या पिढ्यांचा.. २
देवापुढे जोडतो हेच हात,
भले कर सर्वांचे ,
लाभू सुख आता,
हेच मागणे सौभाग्यवतीचे.. ३
कोरोनाने वेळ आणली,
कुंकू वाचवा माझ देवा,
धनी राहू देत सोबतीला,
तोच आयुष्याचा सोनेरी ठेवा.. ४
