खुणावे चांद पुनवेचा
खुणावे चांद पुनवेचा
1 min
278
चांदरात बहरून आली,
जणू दागिना हा नभीचा,
निरभ्र आकाशी या
खुणावे चांद पुनवेचा.. 1
टिपूर या चांदण्यात,
शोभतो हा चांदवा,
जणू काळ्या रात्रीत,
चमकतो हा काजवा.. 2
पुनवेची ती रात,
चंद्र चांदणीची भेट,
बहरली ती रातराणी,
तिचा सुगंध आसमंत थेट.. 3