विश्वास...
विश्वास...


शब्द शब्द छान वेचला
ओळींची रचना जमू लागली
कवितेचा ध्यास लागला
नकळत कविता रचली...
तरल भावना जपल्या
मनी रुंजी घालू लागल्या
ओठातून बरसू लागल्या
धारारुपांनी कागदी उमटल्या...
कागदावर शब्द स्थिरावले
विश्वासाने लेखन केले
लेखणीत ते विसावले
कवितेत सर्व सामावले...
चारोळीतून कवितेत झेपावले
साहित्याला मिठी मारू लागले
मायेनं पुस्तकात लपले
अखंड प्रेमात बुडाले...
पाऊसधारांप्रमाणे बरसेल
संग्रह माझा कवितांचा
विश्वास आहे सर्वांचाच
साथीदार माझा विश्वासाचा...