STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Inspirational

विरपूत्र

विरपूत्र

1 min
1.0K


निधड्या छातीच्या वीर जवाना

टपून बसला काळ कसा रे

चिंधड्या तुझ्या उडवण्या

निघालास जेव्हा तू मातृभूमी रक्षण्या


विव्हळली रे धरणीआई

कंप सुटला चराचराला

काय करावे कळेना आता

थरथरली रे तुझी भारतमाता


चाळीस पुत्र ज्या माऊलीचे

शहीद झाले क्षणात

वेडीपिसी ती झाली आई

कवटाळून पुत्रांना घेई


शब्द फुटेना अंतरातूनी

कंठ दाटला रे

पाहून लक्तरं देहांची ती

उर फाटला रे


अंगार झाला तनामनाचा

घेईन प्रतिशोध दुष्मनाचा

एक एक विरपुत्र माझा

घेईन बदला रक्ताचा तुझ्या


माणूसकीची सिमा संपली

लक्ष्मणरेषा त्यांनी ओलांडली

आता नाठाळाचे पाठी

हाणू सारे मिळून काठी


जाणते लेकरा भावना तुझी रे

देशप्रेम घेऊनी मनी तू

निघालास कफनी शिरी बांधूनी

तिलक भालावर केला युध्दनीती स्मरूनी


भ्याड,भेकड विचाराने

हल्ला केला अविचाराने

मान्य कदापि नव्हते तुला

कवटाळणे असे काळाला


सुप्त भावना तुझ्या मनीच्या

पूर्ण मी करीन

रक्षण्या मातृभूमीला

तुला पुन्हा जन्म देईन

मी पुन्हा जन्म देईन.

.......✍


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational