विरहवेदना
विरहवेदना
खूप गोष्टी गमावल्या पण, तूझ जाण लक्षात राहील.
तू येनार नाहीस अगदी त्याच वाटेला, सतत डोळ्यांनी पाहीन.
पाहण्याच्या बाबतीत सांगायच, तर खूप काही राहून गेलं.
एका झटक्यात एवढा बदल, होत नव्हत सगळ वाहून नेलं
अजूनही वाहून जातात, अलगद डोळ्यातील अश्रू.
जे हात पुसायचे डोळे, त्यांच्या साठी कोनासमोर हात पसरू
पसरले तर तेव्हा पण होते, आणी आताही पसरतोय.
कधीही वापस न येणाऱ्या, अशा पाहुण्यांनची वाट पाहतोय
वाट पाहून दमलो, मात्र चिडलो नाही अजून.
जेव्हा मी स्वताच हरवेल, तेव्हा चमत्कार होईल सांगून
इतक्यात साथ सोडलीस सुटली की, पर्याय नव्हता.
पिंजऱ्यातल्या पोपटाच्याच अंगात, माझा जिव होता
प्रत्येक क्षणी प्रत्येक जागी, आता फक्त तुलाच पाहे.
विरहवेदना सगळ्या पचवेल, त्यातही साथ तुझीच आहे.
