विपरित
विपरित
असंख्य विचाराने वळलेले
खिन्न खितपत पडलेले
चांगुलपणाचे सडके शरिर
अगती बेडसावलेले
श्वास बंद करून शोधत
स्वताला स्वता मध्ये
निद्रिस्त होहुनी
कोंडलेल्या अद्भूत शक्तीचे
संचार ओढावत
विचारातून कल्पनेत
निर्माण झाला एक राक्षस
संयमाने पिछेहाट झालेला
निधर्मी विचारांचा सुड घेत
विषमतेच्या भिंती फोडूनी
धडधड काळजात घेरावला
नशा नशात झपाटला
त्यांचा नाही उतारा
असा हा विपरीत अंतःकरणात उमटला.....
या मनात माणुसकीचे बिज
पसरूनी शैतान झाला.
असा अलादिनचा चिराग सापडेल का?...
तूला मला आणि त्याला......
