Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Swati Darekar

Inspirational

3  

Swati Darekar

Inspirational

विजयादशमी

विजयादशमी

1 min
395


आश्विन शुद्ध दशमीला

सण हा येतो दसरा

हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा

होई चेहरा सर्वांचा हसरा....


दारात झेंडूचे तोरण लावून 

रांगोळीमध्ये रंग भरू 

गोडधोडाचा नैवेद्य करुन

अस्त्र,शस्त्रांचे पूजन करु....


साडेतीन मुहूर्तांपैकी एक 

दसरा हा सण विजयाचा 

देवीने केला वध असूराचा

 दिन पराक्रमाचा, पौरुषाचा....


दसऱ्याला शिवरायांनी प्रतापगडी

प्रारंभ केला भवानी उत्सवाचा

अनेक पराक्रमी, शूरवीर राजे 

करी बेत सिमोल्लंघनाचा......


विजयादशमी सण हा मोठा 

आनंदास नसे काही तोटा

सोन्यासमान आपट्याची पाने

दसऱ्याला सर्वांना वाटा.... 


बुद्धीची देवता सरस्वतीचे

चित्र काढून पूजा करु

घेऊन आशीर्वाद नवदुर्गेचा

खणा नारळाने ओटी भरु..... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational