STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Inspirational

4  

RADHIKA DESHPANDE

Inspirational

वीरांगना

वीरांगना

1 min
152

धन्य जाहलो आम्ही, धन्य झाली भूमी, 

अशी शूर वीरांगना लाभली या मायभूमी।

बालपणापासूनच दाखविले पराक्रम साऱ्यांना,

आपुल्या शौयाने घामाघूम केले गोऱ्यांना।

अत्यंत हुशार, चौकस, धाडसी अशी ती,

भारतमातेची पराक्रमी आदर्श कन्या होती।

लहान ही आमची 'मनु' जशी लखलखती ज्वाला,

प्रणाम हो अशा द्रुढ निश्चयी मनीकर्णीकेला।

सर्व शस्त्रास्त्रे,युद्धकला, घोडेस्वारी ती शिकली,

मोठेपणी 'लक्ष्मीबाई' झाशीची राणी झाली।

तिथेही पराक्रमाने साऱ्यांना अचंबित केले,

'मेरी झाशी नहीं दुंगी, म्हणत इंग्रजांना ललकारीले ।

रणांगणात लखलखत्या विजेप्रमाणे तळपली,

जिवंतपणी तिने कधी शरणागती ना पत्करली।

अत्यंत पराक्रमी स्त्री, इतिहासात अमर झाली,

स्वकर्तृत्वाने इतिहास घडविण्याची, ताकद तिने सिद्ध केली।

वारंवार मानाचा मुजरा अशा या वीरांगनेला,

एका आदर्श कन्येला, जिच्या कर्तृत्वाने देशही धन्य झाला।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational